
देऊळघाट>न्युज महाराष्ट्र लाईव्ह_अलीम खान
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रीय आमदार आदरणीय संजुभाऊ गायकवाड यांनी देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सदिच्छा भेट दिली.
सर्वप्रथम संस्थेचे प्राचार्य आदरणीय आर आर सय्यद सर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. शिवाय त्यांच्यासोबत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत यांचे सुद्धा स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत ज्या काही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या सर्व स्पर्धातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आमदार महोदय यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.आमदार संजुभाऊ समोर संस्थेचे प्राचार्य यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध भौतिक सुविधा विषयक समस्या मांडल्या ज्यामध्ये शाळेला वॉल कंपाऊंड दुरुस्ती, गट्टू बसवणे,मुलींना व महिलांना तसेच मुलांसाठी स्वच्छता गृह संच, शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी. व जिल्ह्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असूनही अपूर्ण शिक्षक संख्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी अपुरे आहेत.
आमदार महोदयांनी सर्व समस्या सोडवण्याचे आस्वासन दिले .तसेच या शाळेत इयत्ता पहिली पासून CBSE पॅटर्न या शाळेत राबविण्यात येईल व गोरगरीब मुलांसाठी नर्सरी ते 12 वि पर्यंतचे शिक्षण एकाच छाताखाली मिळवून देऊ असे जाहीर केले. शिवाय 11वी 12वी अतिरिक्त तुकडी मिळवण्यासाठी प्रयत्न करू हे सुद्धा आश्वसन दिले. शाळेतील शैक्षणिक कामकाज आणि शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांची प्रचंड विद्यार्थी संख्या याबाबत माननीय आमदार महोदय यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी(शिव सेना जिल्हा प्रमुख)ओमसिंग राजपूत,तसेच(शिव सेना तालुका अध्यक्ष)अमान गोहर शेख,(युवाशक्ती प्रमुख)सइद खान ,(शाखा प्रमुख)सुभाष अशोक पुरी देऊळघाट सुधीर घट्टे (शिवसेना शाखा प्रमुख)तसेच सामाजिक कार्यकर्ते साजिद खान युवा सेना कार्यकर्ते शिवसेना नेते फिरोज खान मेकॅनिकल सै इरफान.पत्रकार याकुब खान युवा सेना कार्यकर्ते इस्लाम ठेकेदार सामाजिक कार्यकर्ते सै.सिददीक सामाजिक कार्यकर्ते नजीर शाह सामाजिक कार्यकर्ते सुनील पाठक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद किटे सेना कार्यकर्ते राजुभाऊ पाठक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ सुसर सामाजिक कार्यकर्ते शेख वसीम सेना कार्यकर्ते सरफराज ठेकेदार, तसेच अतहर खान (A K) एडिटर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक अनिल कड यांनी केले. शिवाय सर्व मान्यवरचे आभार उर्दू माध्यम पर्यवेक्षक श्री. सलमान सर यांनी मानले.
