
बीड, न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी,
बीड जिल्ह्याच्या केज येथे चक्क शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारांची माहिती मिळताच जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
वृत्तानुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात शिक्षण विभागात एका अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले असल्याची माहिती मिळताच जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. शिक्षण क्षेत्र हे फार प्रतिष्ठेचे आणि आदराचे मानले जाते.
शिक्षकाला गुरूस्थानी ठेवून त्यांची आपण पूजा करतो. आपल्या परिवारानंतर आपण शिक्षकावर मोठा विश्वास ठेवून मुले सोपवतो. मात्र शिक्षकच गैरवर्तन करत असेल तर विश्वास नेमका कोणावर ठेवायचा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड येथील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एक अधिकारी त्याच्या खाजगी गाडीतून एक महिला व त्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात होता. त्या मुलीशी तो अधिकारी गैरवर्तन करीत असल्याचे महिलेच्या लक्षात आले म्हणून तिने मदतीसाठी संपर्क साधला, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही युवकांनी त्या मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्या गाडीचा पाठलाग करून अखेर मोठ्या मुश्किलीने त्या गाडीला अडवण्यात यश आले. मात्र त्या नराधम अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्याने त्याचा मोबाईल आणि गाडी सोडून पळून गेला आणि मुलगी बचावली, असल्याचे सांगण्यात आले आहे.
