११ पालिका १३ पंचायत समिती व १ जिल्हा परिषद

बुलढाणा,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह):
ओबीसी आरक्षणाचा मार्ग न्यायालयाने मोकळा केल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तयारीत असलेल्यांमध्ये जोश आला आहे. मात्र अध्यक्षपदावर डोळा असलेल्यांना अजुनही आरक्षण काय निघणार याबाबत उत्सुकता कायम आहे. आता गट व गणांचे आरक्षणच चक्रामक्रानुसार निघणार असल्याने उभेच्छुकांची बोलती बंद झाली आहे. जिल्ह्यात अकरा नगर पालिका व दोन नगर पंचायती आहेत. नगर पंचायतींची निवडणुक झाली असून २०२२ मधील नऊ व आता कालावधी संपलेल्या दोन अशा अकरा नगर पालिकांची निवडणुक लागणार आहे. पालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यावर हरकमी मागणे सुरु आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या हरकतींचा निपटारा करण्यात आल्याने आता आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आरक्षणातून कोणते आरक्षण जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निघते. याकडे लक्ष लागुन आहे. पंचायत समितीचे सभापती पदाचे ही आरक्षण काढण्यात आले होते. परंतु, आता ते सुध्दा जर चक्रानुक्रमानुसार झाले तर अनेकांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. जिल्हा परिषदेचेआधीचे ‘आरक्षण हे महिला सर्वसाधारण जागेसाठी होते. त्यावर भाजप व काँग्रेसच्या महिला सदस्यांनी राज्य केले होते. कोरोना काळातही या सदस्यांनी आपली कामगिरी बजावली होती. आता अध्यक्षपद जर सर्वसाधारण किंवा ओपन निघाले तर निवडणुकीत मोठी रस्सीखेच बघावयास मिळणार आहे.
