
बुलढाणा (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य आयोजित मातंग समाज जिल्हा संकल्प मेळावा व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलडाणा विधानसभा चे दमदार आमदार धर्मवीर संजुभाऊ गायक्वाड होते तसेच उद्घाटक म्हणुन केंद्रीय मंत्री भुमिपुत्र खासदार ना.प्रतापराव जाधव यांची उपस्थितीत
या सोहळ्यात साहित्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानित व्यक्तींमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सदानंद देशमुख, प्रख्यात कवी अजीम नवाज राही, साहित्यिक व पत्रकार राजेशजी राजोरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे, मुनादीकार मांगीलाल राठोड, साहित्यिक व प्रकाशक रवींद्र साळवे व लोकसाहित्य सेवक रामराव झुंजारे यांचा समावेश होता.
तसेच गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंपैकी वैभव यंगड (तलवारबाजी), गीतराज राजू यंगड व ओम अंभोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, मा. आमदार दिलीपकुमार सानंदा, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे वडील अंकुराव पडघान, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व शिवसेना नेत्या सौ. अनुजाताई सावळे तसेच
स्वागताध्यक्ष विजयजी अंभोरे (संस्थापक अध्यक्ष, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम), शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रदेशाध्यक्ष सोपान पानपाटील, मुख्य सचिव बी.के. खरात, प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे, एस.एल. डोंगरे, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, प्रदेश संघटक विजय पारेकर, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण गवई, ओमप्रकाश नाटेकर, अंजनाताई खूपराव, शुभेच्छाताई अंभोरे, दिगंबर पाटोळे, राजू नाडे, रामेश्वर जाधव, गजानन गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थित होते.
