
बुलडाणा (न्युज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील किन्होळा गावातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व हायस्कूलमध्ये (१ ते १० वी) शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे शिक्षक मागितले तरीही दुर्लक्ष झाले.
या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने आज बुलढाणा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांची शाळा भरवली. समितीचा इशारा आहे की, जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही.
सध्या या आंदोलनामुळे प्रशासनावर शिक्षक नेमण्याचा दबाव वाढला आहे.
