
बुलढाणा:(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान)
बुलढाणा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष रिजवान खान सलमान खान उर्फ राजू खान यांची निवड करण्यात आली आहे.
बुलढाणा तालुक्यातील ७ की मी अंतरावर असलेल्या देऊळघाट गावात रहिवाशी राजू खान यांची पार्टी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांची झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे . सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रिजवान खान उस्मान खान यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी कार्य करण्याच्या निर्धार व्यक्त केला आहे त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासोबत युवकांना संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे सांगितले निवडीबद्दल विविध स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक आघाडी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
