
बुलढाणा (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,
जिल्ह्यातील 51 हजार 430 लाडक्या बहिणीच्या लाभ तात्पुरता थांबवला कागदपत्राची पडताळणी करून घेण्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल दिघोडे यांचे आवाहन.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने घाई गडबडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली या योजनाच्या अतिरिक्त भार राज्य शासनाच्या तिजोरीत पळत असल्याची ओरड होत आहे.
या योजनेचे लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय योजना करत आहे त्यामुळे 65 वर्षावरील आणि एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत न बसणारे एकूण 51 हजार 430 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आलेला आहे ज्या महिलांच्या अनुदान खात्यात येत नसेल त्यांनी आपल्या तालुक्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून आपले कागदपत्राची प्रताळणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोडे यांनी केले आहे.
