डॉ.अभिलाष माळी यांचे सर्व स्तरावरून होतंय कौतुक..

बुलढाणा,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान)
बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध सर्जन म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर अभिलाष माळी यांचे विद्याविश्व रुग्णालयात आज दिनांक ०६-०८-२०२५ रोजी बुलढाणा निवासी असलेले राजू गडाख वय ५५ वर्ष यांची उजवी किडनी खराब होऊन त्याचे इन्फेक्शन मुळे पोटात खूप मोठा मासाचा गोळा तयार झाला होता त्यावर डॉक्टर अभिलाष माळी यांनी डायग्नोसिस केल्यावर किडनीच्या आकाराच्या पेक्षा दहापट जास्त मोठा मासाच्या गोळा निर्माण झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सदर रुग्णास व त्यांचे नातेवाईकांना सांगितले असता डॉक्टर अभिलाष माळी यांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याच्या सल्ला दिला तेव्हा गडाख यांच्या नातेवाईकांनी त्यास मंजुरी देताच डॉक्टर अभिलाष माळी यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.
सदर शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्यांनी भूलतज्ञ डॉक्टर राम तायडे यांच्या मदतीने शस्त्रक्रिया पार पाडली.
त्यानंतर श्री गडाख या रुग्णाच्या पोटातून तब्बल अंदाजे एक दीड किलो असलेला मासाचा गोळा यशस्वी शस्त्रक्रिया द्वारे बाहेर काढून सदर रुग्णाचे प्राण वाचवले यापूर्वी सुद्धा डॉक्टर अभिलाष माळी यांनी अनेक अवघड शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहे त्यांच्या या शस्त्रक्रिया प्रसंगी त्यांचे रुग्णालयातील गोपाळ खरात व सर्व सहकार्यांचे सहकार्य यावेळी मिळाले.
