
बुलढाणा • न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी
उन्हाळा सुरु झाला असतांना एकीकडे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आणि अशा गर्मीच्या दिवसात बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर देऊळघाट येथील राहणारी अवघ्या ३ वर्ष ३ महिन्याची चिमुकली खदीजा कायनात इमरान खान यांनी आपल्या जीवनातील पहिला (उपवास) रोजा पुर्ण केला आहे. इस्लाम धर्मात रमजान महिन्याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेच्या ‘सहरी’ पासून ते सूर्यास्त पर्यंत नंतरच्या ‘इफ्तार’ पर्यंत उपवास (रोजा) करतात. संयम, शिस्त, प्रार्थना आणि इतरांप्रती सहानुभूती यांचा संदेश देणारा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात पवित्र कुरआन अवतरलेला असल्याने अल्लाहची विशेष कृपा प्राप्त होते. या काळात नेकीचे फळ बहुगुणित होते आणि इबादत, दानधर्म व आत्मशुद्धीवर भर दिला जातो. इस्लाम धर्मामध्ये ५ स्तंभ असून त्यापैकी रोजा हा देखील एक आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी इत्यादी टाळून रोज धरला जातो. रोज्याचा उद्देश आत्मसंयम, गरीबांची स्थिती अनुभवणे, पापांपासून दूर राहणे आणि अल्लाहशी जवळीक साधणे असतो. खदीजा या लहान मुलीनी पवित्र रमजानमध्ये रोजा धरत सध्या सहेरी पासून इफ्तार पर्यंत १२ तासाचा उपवास असून वयाच्या ३ वर्षी उपवास केल्याने एवढ्या लहान वयात रोजा पाळण्याचा त्यांचा निर्धार पाहून परिसरातील शहरातील नागरिकांकडून खदीजा कायनात याचा कौतुक होत आहे. यावेळी त्याचे आजोबा रियाज अहेमद सर,वडील इमरान खान,काका डॉ गुफरान खान,मामा डॉ वजाहत, यांच्या कडून हार टाकून त्याचे कौतुक करण्यात आला.
