Skip to content
June 1, 2026
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हा
  • जग
  • ठळक बातम्या
  • देश
  • धर्म
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • add
  • add
newsmaharashtralive9.com

newsmaharashtralive9.com

Primary Menu
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हा
  • जग
  • ठळक बातम्या
  • देश
  • धर्म
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • add
  • add
Light/Dark Button
Subscribe
  • Home
  • आ. सौ. श्वेता महाले यांच्या शेतकरीहिताच्या मागणीला कृषिमंत्र्याकडून तत्पर प्रतिसाद…
  • बुलढाणा जिल्हा

आ. सौ. श्वेता महाले यांच्या शेतकरीहिताच्या मागणीला कृषिमंत्र्याकडून तत्पर प्रतिसाद…

admin 11 months ago (Last updated: 11 months ago) 1 minute read 0 comments

 

 

चिखली,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) चिखली प्रतिनिधी,शेतकऱ्यांच्या जीवनात अस्मानी संकटांचा सुरू असलेली साखळी शासकीय उपायांनी कमी करावी यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळामध्ये बोलून दाखविला, त्या अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगवले आहे परंतु आता कोळपणीच्या टप्प्यातच सदर पिकावर हुमणी अळीचा जबरदस्त हल्ला झाल्याने पीक मुळासकट नष्ट होत आहे. ही अळी मुळाशी व खोडाशी हल्ला करून पीक नष्ट करत आहे त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत या अळीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणचे ताबडतोब पंचनामे करून घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी सभागृहाकडे केली.मतदारसंघात हुमनी अळी सोयाबिन पिकावर पडली असून या मूळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चिखली विधानसभा मतदार संघातील विशेषता 12 गावांमध्ये सोयाबीनचे हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे, व कीड रोगामूळे नुकसान झाले असून ( तालुक्यातील देऊळगाव धुबे, मेरा बु., कोनड खुर्द, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहाँगीर, मुंगसरी, अन्वी, तेल्हारा, मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, सोमठाणा, दिवठाणा आदी गावांतील शेतात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे.)कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ यांनी पाहणी करून या अळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यावर कृषी विभागाच्या सल्यानुसार डवरणी, स्प्रिंकलर लावणे, औषधी फवारणी केली तरी सुद्धा अळी नियंत्रणात येत नाही आहे.तसेच शासन निर्णयात किंवा पिक विमा योजनेमध्ये किड रोगाने, अळीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे संदर्भात तरतुद नाही. अशा वेळेस निसर्गाच्या प्रकोपामुळे परेशान झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे असून, या भागातील शेतकरी शासनाकडे आशेने बघत आहे.असे आ. सौ श्वेता महाले यांनी सभागृहाला सांगितले.

या हुमणी अळीमुळे किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती आ. सौ श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केली.

आमदार सौ श्वेता महाले यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या सदरात हा मुद्दा मांडला आणि राज्याचे कृषिमंत्री यांनी या मुद्द्याची लगेच दखल घेऊन आमदार सौ श्वेता महाले यांना यासंबंधी चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. आमदार सौ श्वेता महाले यांनीही वेळ न दवडता कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या अळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संपूर्ण विवरण केले व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी लेखी निवेदनही दिले.

राज्याचे कृषिमंत्री यांनीही शेतकऱ्यांच्या आवाज बनून आलेल्या आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या निवेदनाला प्रतिसाद दिला. आणि बुलढाण्याचे कृषी अधिकारी श्री मनोज कुमार ढोके यांच्याशी त्वरित दूरध्वनीवरून संभाषण साधत बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.

कित्येक दशकापासून लाल फीतशाहीचा आरोप होत असलेल्या शासकीय कामांमध्ये आमदार सौ श्वेता महाले यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळात मांडणे, काही क्षणात कृषिमंत्र्यांचा त्यांना फोन येणे, कृषिमंत्र्यांनी परिस्थिती समजावून घेणे आणि लगेच जिल्ह्याच्या कृषी अधिकारी यांना फोन करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असा आदेश देणे, या सर्व बाबी “आजचा दिवस माझा” या सिनेमाची आठवण व्हावी तेवढ्या तत्परतेने करण्यात आल्या त्यामुळे जनमानसात शासन, मुख्यमंत्री, मंत्री मंत्रिगन, व लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल विश्वासाची भावना तयार होत आहे.

About the Author

admin

Administrator

Visit Website View All Posts

Post navigation

Previous: शिक्षकांचे व शाळांचे प्रलंबित प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांची भेट
Next: शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Picsart_26-06-01_12-00-45-956
  • बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील १७ अधिकारी व अंमलदारांचा सेवावृत्ती सोहळा संपन्न

admin 5 hours ago 0
Picsart_26-05-29_20-28-23-925
  • बुलढाणा जिल्हा
  • राजकारण

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर;  हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

admin 3 days ago 0
Picsart_26-05-29_19-26-31-300
  • बुलढाणा जिल्हा

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 36 हजार लिटर इंधन दाखल अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

admin 3 days ago 0
[metaslider id="669"]

Recent Posts

  • बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील १७ अधिकारी व अंमलदारांचा सेवावृत्ती सोहळा संपन्न
  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला यश; मराठा समाजात आनंदाचे वातावरण..14 प्रमुख मागण्यांवर शासनाची सकारात्मक भूमिका
  • ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर;  हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या
  • जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 36 हजार लिटर इंधन दाखल अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन
  • जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हा
  • देश
  • धर्म
  • बुलढाणा जिल्हा
  • राजकारण
  • राज्य
  • व्यवसाय
  • शिक्षण

SOCAIL

You May Have Missed

Picsart_26-06-01_12-00-45-956
  • बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील १७ अधिकारी व अंमलदारांचा सेवावृत्ती सोहळा संपन्न

admin 5 hours ago 0
Picsart_26-06-01_11-48-18-814
  • धर्म
  • राज्य

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला यश; मराठा समाजात आनंदाचे वातावरण..14 प्रमुख मागण्यांवर शासनाची सकारात्मक भूमिका

admin 5 hours ago 0
Picsart_26-05-29_20-28-23-925
  • बुलढाणा जिल्हा
  • राजकारण

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर;  हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

admin 3 days ago 0
Picsart_26-05-29_19-26-31-300
  • बुलढाणा जिल्हा

जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 36 हजार लिटर इंधन दाखल अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

admin 3 days ago 0

न्यूज महाराष्ट्र लाईव्ह या वेब संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखअशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही काही वाद उद्धवल्यास बुलढाणा न्यायालय अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.

VISITOR COUNTER

Free-Counters

  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हा
  • जग
  • ठळक बातम्या
  • देश
  • धर्म
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • add
  • add
Copyright © 2026 All rights reserved. | ReviewNews by AF themes.