जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभार!

न्युज महाराष्ट्र लाईव्ह/ प्रतिनिधी,
बुलढाणा :- शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम बहुल देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक सैय्यद रियाज सैय्यद रफीक यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर रायपूर येथील शिक्षकाची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली असता त्यांनी देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेचा पदभार स्विकारला मात्र पुर्विच्या मुख्याध्यापकांनी अजून पर्यंत सदर पदभार नवनियुक्त मुख्याध्यापक यांना दिला नसल्याने नविन पेच निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊन त्यात असे दिसून आले आहे की,
गावातील उर्दू व मराठी जि.प. च्या शाळेमध्ये दोन मुख्याध्यापक आजरोजी कार्यरत असतांना दिसून येतात. तर अधिकार कोणाला हा मात्र गंभीर विषय जि.प. प्रशासन व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) निर्माण केला असल्याने त्यावर तात्काळ योग्य निर्णय घेऊन विद्यार्थी व पालक यांचे मनोबल वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल.
शाळा समिती अधक्ष व इतर लोकांनी राजकीय दबावाखाली सदर मुख्याध्यापक सैय्यद रियाज सैय्यद रफीक यांची बदली केली असून त्यांना आर्थिक लाभमुख्याध्यापक यांचेकडून होत नसल्याने सदर मुख्याध्यापक यांचे विरोधात खोट्या तक्रारी दाखल करुन त्यांना पदावरुन हटविण्याचे षडयंत्र शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी केले असल्याचे बोलल्या जात आहे. वास्तविक पाहता शाळेमध्ये अनेक सोई-सुविधा मुले-मुली यांचेसाठी निर्माण करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुख्याध्यापक सैय्यद रियाज सैय्यद रफीक यांना कायम पदावर ठेवण्यात यावे अशी मागणी गावतील पालक व नागरीकांसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
