
बुलडाणा > न्युज महाराष्ट्र लाईव्ह :-
जिल्हा परिषद बुलढाणा येथे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांची समस्या निराकरण सभा दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रम बाबत सभेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघ , अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, व इतर सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस आणि सर्व संघटना राज्य अध्यक्ष राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या सभागृहात मांडल्या, माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी समस्यांचे निराकरण केले व उपाय सांगितले तसेच सर्व संघटनांना सहकार्याचे आवाहन पण केले. विद्यार्थी व शाळांच्या हितासाठी अनुकूल व चांगली भूमिका घेण्यासाठी आवाहन केले.
