
बुलडाणा >न्युज महाराष्ट्र लाईव्ह:-
जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त तालुका व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक रियाज अहमद अब्दुल वहाब तसेच (विश्वविख्यात कवी) रियाजुद्दीन तमिजउद्दीन सर, सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद साबीर अब्दुल रज्जाक यांच्या शिक्षक भारती संघटना व अदिती अर्बन परिवाराचे वतीने एका समारंभात भव्य सत्कार केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इंग्रजी विषयात प्रावीण्य मिळालेले शिक्षक रियाज अहेमद अब्दुल वहाब यांच्या व त्यांचे सहकारी शिक्षक रियाजुद्दिन तमिजुद्दिन आणि मोहम्मद साबीर अब्दुल रज्जाक यांच्या सेवानिवृत्तीनंतर दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक भारती संघटना व अदिती अर्बन बँक परिवाराचे मलकापूर रोडवरील आरटीओ ऑफिस समोरील अदिती अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात सत्कार करण्यात आला. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन तसेच त्यांच्या उत्कृष्ट इंग्रजी उर्दू व भूगोल शिकवण्याची पद्धत याच्या सुद्धा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.
याप्रसंगी त्यांचे सहकारी असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोहम्मद साबीर अब्दुल रजाक व रियाजुद्दीन तमीजुद्दीन सर यांच्या सुद्धा शैक्षणिक बाबींच्या उल्लेख उपस्थितांनी करीत त्यांच्याही सत्कार यावेळी समारंभात करण्यात आला त्यांना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच श्री अबूजैद सर अली अलाना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मलकापूर यांची नियुक्ती शिक्षक भारती संघटना चे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. अदिती अर्बन परिवार, बुलढाणा चे संस्थापक व अध्यक्ष श्री देवकर सर ह्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात ही प्रथमच वेळ आहे की शिक्षक भारती संघटना व आदिती अर्बन परिवार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्यसमारंभात सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल सत्कार करून त्यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल शिक्षकांमध्ये उत्कृष्ट शिक्षण द्यावे असा हेतू सत्कार समारंभ आयोजकांनी केला आहे.
