
जालना,( न्यूज महाराष्ट्र लाईव्ह): प्रतिनिधी,
दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी राजुर-टेंभुर्णी रस्त्यावर देळेगव्हाण फाट्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी विहिरीत कोसळून त्यामध्ये असलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
प्राप्त माहिती अशीकी डकले परिवारातील अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सुलतानपूर येथे दवाखान्यामध्ये कोपर्डा येथून राजूर मार्गे घेऊन जात असताना हा अपघात झाला. i20 कार ही कार भरधाव वेगाने राजुर ते टेंभुर्णी महामार्गावर सकाळी 5 ते 6 वाजता जात होती या कारने मॉर्निंग वॉकला चाललेला देळेगव्हाण फाट्याजवळ एक व्यक्तीला जोरदार धडक दिली या दरम्यान कारचालक कार घेऊन पळत जात होता या गडबडीतच ही कार रोडच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. ही कार एवढी जोरात होती की विहिरीवरील सिमेंटची कतडे तोडून खोल असलेल्या 80 फूट विहिरीत पडली,
यावेळी स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत पूर्ण गाडी पाणीत बुडाली होती याची माहिती स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तात्काळ हसनाबाद पोलिसांना व टेंभुर्णी पोलिसांना दिली,
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत बचाव कार्य सुरू केले मात्र पाणी जास्त असल्या मुळे विहिरीतून गाडी वर काढण्यासाठी व बुडालेल्या प्रवाशांना वर काढण्यासाठी पोलिसांना व अग्निशमन विभागांना अडचणी निर्माण येत होती 7 ते 8 तास परिश्रम करत पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पैठण येथून आलेल्या तरुणांनी सर्व मृत्युदह वर काढले त्यामध्ये 2 महिलासह 3 पुरुष असे एकूण 5 जण नावे पदमाबाई लक्ष्मण भांबीरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबीरे, अजिनाथ तुळशीराम भांबिरे तर गेवराई गुंगी येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले आणि निर्मलाबाई सोपान डकले असे आहे.
