
लोणार,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख)
किनवट-छ.संभाजीनगर(औरंगाबाद) बसफेरी पुर्ववत सुरू करावी प्रवासी सेवा संघटना लोणार यांच्या मागणीनुसार दि.१३ फेब्रुवारी २०११ मध्ये सुरू करण्यात आलेली किनवट आगाराची किनवट-छ.संभाजीनगर(औरंगाबाद) मार्गे माहुरगड,पुसद,वाशिम, रिसोड, लोणार, सुलतानपुर,सिंदखेडराजा,जालना हि गत सात वर्षापासुन सुरू असलेली नियमित बसफेरी कोरोना काळात बंद करण्यात आली होती तसेच कोरोना काळ संपल्यानंतर सदर फेरी पुर्ववत सुरू करण्याचा विसर राज्य परिवहन महामंडळाला पडलेला आहे.गत पांच वर्षापासून सदर फेरी पुर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना परिवहन महामंडळाकडे करीत आहे परंतु कोणतीच दखल घेत नसल्याने दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी परिवहन मंत्री तथा अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांना सदर फेरी पुर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी सेवा संघटना लोणार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनाची प्रत राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,मुंबई, महाव्यवस्थापक (वाहतुक)मुंबई, प्रादेशिक व्यवस्थापक, छ.संभाजीनगर(औरंगाबाद)विभाग नियंत्रक,नांदेड आणि आगार व्यवस्थापक,किनवट यांना पाठविण्यात आली असुन सदर एकमेव बसफेरी पुर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत असल्याने परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी सदर मागणीची त्वरित दखल घेऊन प्रवाशांची प्रवासाची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे
