
लोणार (न्युज महाराष्ट्र लाईव्ह/यासीन शेख) –
लोणार नगर परिषदेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून याविषयी 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
लोणार नगर परिषदेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भौगोलिक सीमांसह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून याविषयी 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सन 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आली असून नगर परिषद क्षेत्रामधून 20 सदस्यांना निवडून द्यावयाचे आहे. शहरातील 23 हजार 416 लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीचे 2602 तर अनुसूचित जमातीची 990 लोकसंख्या असल्याचे दिसून आले आहे.नगर परिषदेत दोन सदस्य असणारे 10 प्रभागाची रचना करण्यात आली असून प्रभाग रचना करताना 2342 लोकसंख्या अनुसरून प्रारूप प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नगरपरिषदेमधील नियोजित प्रभागांमध्ये किमान 2108 ते कमाल 2576 लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक असून यामुळे विद्यमान नगरसेवक व नगरपरिषद निवडणूक निवडणुकीच्या प्रभाग रचने मोठ्या प्रमाणात बदल झाला प्रभाग संख्या 8 वरून 10 तर सदस्य संख्या 20 करण्यात आली आहे. लढविण्यास इच्छुक असणाऱ्या मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत याविषयी आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर अंतिम निर्णय घेऊन प्रभाग रचना व त्यावरील आरक्षण जाहीर करण्यात येणार
इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरु..!
इच्छुक उमेदवारांकडून प्रभागाचा अभ्यास सुरु झाला असून कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या प्रभागात निवडून सोपी जाईल यांची समीकरणे बांधायला आता सुरुवात झाली आहे. कोणता उमेदवार साखळीमध्ये फिट बसेल यांची चाचपणी केल्या जात आहे. प्रभागातील लोकसंख्या किती कोणते मतदार कोणात्या उमेदवाराला पसंती देतील हे देखील पाहिल्या जात आहे. पण यावर्षी मतदारराजा कोणाला आपल्या नगरसेवक रूपाने स्वीकार करणार हे येणाऱ्या काळातचं कळेल.
