बेजवाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करा जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना सोयरे सुतक नाही, भेट सुद्धा घेतली नाही !

बुलडाणा(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह):-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिगाव प्रकल्पातील पुनर्वसन करण्यासाठी नदीत उडी घेऊन बलिदान दिलेल्या विनोद पवार यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. यावेळी बेजवाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी रेटून धरली आहे. सरळ रस्ता वाकडा करण्याचे काम राजकारणी यांनी केलं असून, या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांचा राजकीय बळी गेला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जिल्हाधिकारी
बेताल आहेत. शासनाच्या हातातील बाहुले असणाऱ्या व शासनाचा मोठा पगार घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली नाही. ते वेडंवाकडं बोलतात.. याचाही धिक्कार आहे. कुणी मंत्री देखील आले नाहीत. ही गंभीर घटना घडल्यामुळे प्रशासनाची ही जबाबदारी आहे. भारतीय दंड संहिता नुसार जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
