
बुलडाणा, (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड सुरेश थोरात, अजिंक्य घोडके, डॉ. जयश्री ठाकरे, तहसीलदार वृषाली केतकर, विजय सवडे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
