
बुलढाणा,(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान) गेल्या काही दिवसापासून गोरक्षणाच्या नावाखाली विविध संघटनांकडून पशु व्यापाऱ्यावर प्राणघात हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. या घटनांमुळे पशु व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे अनेक घटना मुळे त्रस्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील पशु व्यापारी कुरेशी समाजाने जनावराची खरेदी व विक्री बंद केली आहे.
शेतकऱ्यांकडून वयोवृद्ध व शेतीसाठी आयोग जनावरे खरेदी करतात तरीही गोरक्षणाच्या नावाखाली त्याचे वाहनावर हल्ले होतात.
कायद्यात बदल करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज शुक्रवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता, बुलढाणा येथील इकबाल चौकातून आज एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला तसेच या मोर्चामध्ये सहभागी एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनावर कारवाही करावी व कायद्यात बदल करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आपले भाकड जनावरे विकण्यासाठी अडचण येणार नाही आज संपूर्ण राज्यात जनावरे खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकल्याने शेतकरी वर्ग संकटात आहे.
