बुलढाणा,( न्यूज महारष्ट्र लाईव्ह)सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन दुचाकीवर फिरत असलेला एक व्हिडीओ वायरल झाला होता. ही घटना बुलढाणा शहरातील असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे.ही घटना ३० जुलै २०२५ रोजी सोशल मीडिया सेलच्या निदर्शनास आली. इंस्टाग्रामवर दोन तरुण हातात कोयता घेऊन दुचाकीवरून फिरताना आणि व्हिडीओ शूट करताना दिसत होते. त्यांनी तो व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.पोलीसांनी दोघांना ३१ जुलै रोजी अटक केली. आरोपींची नावे,
अमित सुनिल बेंडवाल (वय 23) रा. वार्ड नं. 1, नगर परिषद मागे, बुलढाणा व आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख (वय 23) – रा. शिवराज नगर, शरद कॉलेज मागे, बुलढाणा पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपरोक्त कार्यवाही मा. श्री. निलेश तांबे, पोलीस अधिक्षक, बुलढाणा, श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलढाणा, मा. श्री. सुधीर पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांचे आदेशान्वये ठाणेदार श्री. रवि राठोड, पोलीस स्टेशन, बुलढाणा शहर, सपोनि प्रताप भोस, पोउपनि रवि मोरे, पोहेकों संदीप कायंदे, पोहेकों, सुनिता खंडारे, पोकों विशाल बनकर, पोकों विनोद बोरे, पोकों युवराज शिंदे, पोकों मनोज सोनुने, पोलीस सोशल मिडीया सेल, बुलढाणा यांनी केला आहे.
पोलीसांचे आवाहनः
सोशल मिडियाचा गैरवापर करू नका. अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करणे गुन्हा आहे. कोणी आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. बुलढाणा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमी सज्ज आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
