
बुलडाणा :(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान)बुलडाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-ई वर देऊळघाट आणि पाडळी गावाजवळ मोठी रहदारी असते. या गावांमध्ये शाळा, दुकाने आणि फेरीवाले असल्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची सतत वर्दळ असते.महामार्गावरील वाहने भरधाव वेगात धावत असल्याने या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दोन्ही गावाजवळ दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
ही मागणी उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी तात्काळ मान्य करून रस्त्यावर गतीरोधक बसवावेत, अशी शासनाकडून अपेक्षा आहे. या निवेदनात नमूद केला आहे की जर 15 दिवसाच्या आत गतिरोधक दोन्ही बाजू बसण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर गावकऱ्या सह आंदोलनच्या इशारा सुद्धा या निवेदनद्वारे समाज सेवक रिजवान खान उस्मान खान देऊळघाट यांनी केली आहे.
