
बुलढाणा(न्युज महाराष्ट्र लाईव्ह) जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे यांना आज 23 जुलै रोजी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बुलढाणा यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई बुलढाणा शहरातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय मुठले आऊट बुलढाणा कार्यालयात करण्यात आली, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हा शेतकरी असून त्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली आहे. विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतेही अडचण न येऊ देण्यासाठी व त्यांना भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लाचेची मागणी केली. लोकसेवक गजानन टेकाळे व खाजगी इसम देवानंद खंडाळे यांनी तक्रारदार यांना 70 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड करून 50 हजार रुपये पर्यंत ते तयार झाले. त्यापैकी पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. व उर्वरित 25 हजार रुपये ज्वारीचे बिल निघाल्यानंतर घेणार असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी एसीबी ऑफिसला या प्रकरणाचे तक्रार केली यावरून लोकसेवक गजानन टेकाळे यांना रंगी हात पकडण्याकरता सापळा रचण्यात आला. लोकसेवक गजानन टेकाळे यांच्या वतीने खाजगी इसम देवानंद खंडाळे सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक यांनी यांनी पंचायत समक्ष लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लाथ मागणी व स्वीकारल्या बाबत पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती श्री मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अँटिक करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे, यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक ACB बुलडाणा भोगोजी चोरमले, सापळा पथक पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, सहायक फौजदार श्याम भांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, पोलीस नाईक जगदीश पवार, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, गजानन गालंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती वाणी, चालक नितीन शेटे यांनी हे कारवाई पार पाडली आहे.या घटनेमुळे शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार अजूनही किती खोलवर रुजलेला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा कार्यालय या ठिकाणी कळवावे असे आव्हान पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
