
लोणार, न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधि
लोणार, दि. २४ एप्रिल २०२६ (शुक्रवार) रोजी मदरसा अली हसन नदवी, झमझम कॉलनी, डॉ. जाकिर हुसेन फंक्शन हॉल, लोणार येथे जमीयत उलेमा लोणार यांच्या वतीने जिल्हास्तरीय समाज सुधार प्रोग्राम व तक़सीम-ए-इनामात व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी “लोणार येथील पुढील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा” अंतर्गत चार गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे —
शेख शफाअत शेख शौकत — ठाणे सिटी पोलीस मध्ये निवड.
नगमा शेख शफाअत — नवी मुंबई पोलीस मध्ये निवड.
शेख साहिल शेख शकील (लोनी लव्हाळा) — ठाणे सिटी पोलीस मध्ये निवड.
मोहम्मद आकिद खान निसार खान,(भूकर मापक) — उप अधीक्षक, भूमी अभिलेख , जालना येथे निवड.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना नसरुल्ला खान (नांदेड), अध्यक्ष स्थानी हाफिज अब्दुल हमीद (रिसोड), मौलाना मुदस्सिर (रिसोड) आणि मौलाना ओवैस खान (रिसोड) उपस्थित होते. कार्यक्रमाची निजामत मौलाना रहमान व हाफिज राजिक यांनी प्रभावीपणे पार पाडली.
यावेळी एड रिजवान जड़ा अध्यक्ष जमीयत उलेमा लोणार आणि मौलाना नसरुल्ला खान साहेब (शिक्षण तदन्य याने शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि तरुणांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मदरशातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रमही आकर्षणाचे केंद्र ठरले.
कार्यक्रमात शहरातील मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच कासीर संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते. रात्री ०८.०० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शेवटी अॅड. मोहम्मद रिझवान जद्दा वा हाफिज राजिक अध्यक्ष मदरसा अली हसन नदवी यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम शिक्षण, गुणवत्ता आणि समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या सन्मानाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.
