


बुलढाणा • न्युज महाराष्ट्र लाईव्ह/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी शालेय परिसर दणाणून गेला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक .आर. आर. सय्यद सर (भाऊसाहेब) यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वालनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे कलागुण आणि पोवाडे:
शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित विविध पोवाडे सादर केले. वीररसपूर्ण पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी महाराजांच्या कार्यावर भाषणे दिली आणि काही प्रेरणादायी प्रसंग सादर केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या रणनीतीबद्दल आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज याबद्दल मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आर. आर. सय्यद भाऊसाहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शिवाजी महाराजांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच खरी शिवजयंती ठरेल.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
